चतारी येथे सात व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:08+5:302021-03-18T04:18:08+5:30
गत आठवड्यात तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. या अनुषंगाने पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली सस्ती ...
गत आठवड्यात तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. या अनुषंगाने पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश गाडगे यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. महेविश मॅडम, वैद्यकीय अधिकारी चान्नीचे डॉ. जी.जे. लोखंडे, आरोग्य सेविका प्रतीक्षा दवंडे, आरोग्य कर्मचारी राजेश मानकर, परिचारिका संजय चावरीया, आशा सेविका ज्योती सदार, लक्ष्मी डयुरे या पथकाने कोरोना तपासणीसाठी बुधवार, १७ मार्च रोजी चतारी येते शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी तलाठी आर.एस. पवार, पोलीस पाटील विजय सरदार व बिट अंमलदार आदिनाथ गाठेकर यांच्यासह स्थानिक सर्व पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या शिबिरामध्ये ६४ दुकानदार व व्यासायिक तसेच ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ६४ अहवालांपैकी ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश गाडगे यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता संबंधित विभागाने यासंदर्भात पुन्हा एक-दोन दिवसांनंतर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये गावातील ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.