दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जण जेरबंद

By Admin | Published: February 6, 2017 02:35 AM2017-02-06T02:35:48+5:302017-02-06T02:35:48+5:30

मूर्तिजापूर शहर पोलिसांची कारवाई; ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Seven jawans for the robbery attempt | दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जण जेरबंद

दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जण जेरबंद

googlenewsNext

मूर्तिजापूर (अकोला), दि. ५- दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सात दरोडेखोरांना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री जेरबंद केले. सातही आरोपींना ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठी घटना टळली.
शहरातील बंद पडलेल्या प्रतिभा टॉकीज परिसरात ४ फेब्रुवारी रोजी रात्री १.३0 वाजता सात जण संशयस्पद फिरत असल्याची माहिती मूर्तिजापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर गस्तीवर असलेल्या पथकाने तेथे धाड टाकून सातही जणांना ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी शहबाज खान हजीद खान (अकोला), शेख अलीम शेख युसूफ, शाकीर अहमद शकील अहमद, शेख इमरान शेख मन्नान (सर्व रा.अमरावती), शेख हसन शेख अजीज, अजय ब्राह्मणे रा. बडनेरा यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कलम ३९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कोथकर करीत आहेत. पोलिस तपासात अनेक दरोड्यांचा तपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Seven jawans for the robbery attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.