मुर्तीजापूरमधून सात लाखांचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:22 PM2020-01-06T18:22:01+5:302020-01-06T18:22:15+5:30
पथकाने दोन्ही ठिकाणावरून एकूण ५७ देशी दारूच्या पेट्या, टॅक्स मालवाहू गाडी तसेच ओमनी असा एकूण ६ लाख ५३ हजार ६३२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोला -मुर्तीजापूर शहरातील दोन सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावरून दारूची ग्रामीण भागात मोठया प्रमाणात अवैधरित्या विक्री सुुरु असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने पाळत ठेउन रविवारी रात्री उशीरा छापा टाकला. या ठिकाणावरुन पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ५३ हजार ६३२ रुपयांच्या दारूसह मुद्देमाल जप्त केला.
विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने दोन्ही ठिकाणावरून एकूण ५७ देशी दारूच्या पेट्या, टॅक्स मालवाहू गाडी तसेच ओमनी असा एकूण ६ लाख ५३ हजार ६३२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अक्षय उर्फ सोनु मिलींद पंडागळे, पराग नरसिंग हितांगे, आकाश विश्वास पांडे, गाडी मालक इशाद शहा, गाडी मालक रोहीत अवलवार तसेच एक फरार आरोपी विरोधात मुतीर्जापूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये तसेच मोटर वाहन अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.