अकोला जिल्हय़ात सात लाखांवर वृक्षांची लागवड
By admin | Published: July 9, 2017 09:20 AM2017-07-09T09:20:25+5:302017-07-09T09:20:25+5:30
उद्दिष्टापेक्षा लावले अधिक वृक्ष; वन विभाग, इतर यंत्रणांचा सहभाग.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात १ ते ७ जुलै २0१७ या वन महोत्सवाच्या काळात राबविण्यात आलेला शासनाचा महत्त्वाकांक्षी चार कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हय़ात उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षांची लागवड झाली. जिल्हय़ात तब्बल ७ लाख ५८ हजार ६५२ वृक्षांची लागवड करण्यात आली.
अकोला जिल्हय़ासाठी सुमारे ६ लाख ४0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या सात दिवसांत वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने उद्दिष्टापेक्षा जास्त लागवड झाली. वन विभागाने ३ लाख ६७ हजार २५८ वृक्ष लागवड केले. इतर यंत्रणेने ३ लाख १७ हजार ९४९ झाडे लावली. ह्यमाय प्लान्टह्ण अँपवर ६ हजार ४४१ वृक्ष लागवडीची नोंद झाली आहे. रोप आपल्या दारी उपक्रमांतर्गत १८ हजार ५३ वृक्षांची लागवड झाली आहे. हॅलो फॉरेस्ट ( कॉल सेंटर) अंतर्गत वृक्षांची मागणी केलेल्या ४८ हजार ९५१ वृक्षांची लागवड झाली आहे. वृक्ष लागवडीच्या उपक्रमात शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या, असे वन विभागाने कळविले आहे.