सात समाजकंटक जिल्हयातून तडीपार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:05 PM2019-03-16T13:05:48+5:302019-03-16T13:05:57+5:30
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी शुक्रवारी दिला.
अकोला : लोकसभा निवडणूक तसेच धार्मिक उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला उपविभागातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी शुक्रवारी दिला. त्यामध्ये एकास वर्षभरासाठी, चार जणांना सहा महिन्यांसाठी तर दोन जणांना तीन महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.
अकोला उपविभागातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या समाजकंटाकांविरुध्द तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलीस विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लोकसभा निवडणूक आणि धार्मिक उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामध्ये एक जणास एक वर्षासाठी, चार जणांना सहा महिन्यासाठी आणि दोन जणांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार केलेले असे आहेत समाजकंटक !
रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत लखन तुळशीराम डागोर -एक वर्षासाठी, जूने शहर पोलीस ठाणे अंतर्गत संतोष उर्फ कल्लू अनु