आणखी सात आरोपींना अटक
By admin | Published: March 18, 2017 02:44 AM2017-03-18T02:44:50+5:302017-03-18T02:44:50+5:30
अकोट फैल पोलिसांवरील हल्ला प्रकरण; १४ आरोपींचा जामीन फेटाळला!
अकोला, दि. १७- अकोट फैलमधील दंगल प्रकरणातील १४ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला, तर अकोट फैल पोलिसांनी या प्रकरणात आणखी सात आरोपींना गुरुवारी अटक केली, त्या सातही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रामदास मठ परिसरातील दुकान बंद करण्याच्या कारणावरून अकोट फैल पोलिसांवर व्यापार्यासह इतरांनी हल्ला चढविला होता. यानंतर अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळ गाठून व्यापार्यासह अनेकांची धरपकड सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलासह सर्वच ठाण्याचे ठाणेदार व पोलिसांचे पथक घटनास्थळावर तैनात करण्यात आले आहेत. सोबतच पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनीही घटनास्थळाला वारंवार भेट देऊन परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. तत्पूर्वी जमावाने अकोट फैल पोलीस ठाण्यावरही धाव घेऊन दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मो. सोयेब मो. आसिफ (१८), मो. आरीफ अब्दुल सत्तार (५५), शेख अब्दुला शेख हबीब (३७), अब्दुल मजित शेख हबीब (७0), शेख मुजीब शेख हबीब (३५), मिर्झा शॉ युसूफ शॉ (२४), अनिस अब्दुल सत्तार (३0), कयुम शॉ करीम शॉ (२१), शेख शाहदत शेख शब्बीर (२५),उस्मान शॉ लुकमान शॉ (३0), मो. इरफान मो. आरीफ (१९), मो. नईम मो. आरीफ (१८), मो. युसूफ मो. उस्मान (७0) यांना अटक केली. या सर्वांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला, तर अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा गफ्फार खॉ जब्बार खॉ (४0), शेख जमील शेख गणी (३२), मो. जामीन मो. अन्सार (४४), सलिम खान हजिज खान (३२), शेख जावेद शेख अस्लम (२८), शेख जुनेद शेख बब्बू (२२), जमिल खा जलिल खा (२३) सर्व राहणार युसूफ अली चौक यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.