अकोला मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-हटीया एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द; ८ ते ११ डिसेंबरदरम्यान ब्लॉक

By Atul.jaiswal | Published: December 2, 2023 01:55 PM2023-12-02T13:55:56+5:302023-12-02T13:56:04+5:30

नागपूर विभागात नॉन इंटरलॉकिंगचे काम

Seven trains including LTT-Hatia Express running on Akola route cancelled; Block between 8th to 11th December | अकोला मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-हटीया एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द; ८ ते ११ डिसेंबरदरम्यान ब्लॉक

अकोला मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-हटीया एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द; ८ ते ११ डिसेंबरदरम्यान ब्लॉक

अकोला : नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २ ते ११ डिसेंबर या कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्गावर धावणाऱ्या एलटीटी-हटीया एक्स्प्रेससह सात गाड्यांचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कोणती गाडी कधी रद्द ?
गाडी : कोणत्या तारखेला रद्द
१२८७० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस - ८ डिसेंबर
१२८६९ सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस - १० डिसेंबर
२२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस - १० डिसेंबर
२२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस - १२ डिसेंबर
१२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस - ८ व ९ डिसेंबर
१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस - १० व ११ डिसेंबर
१३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस - २ व १२ डिसेंबर
१३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस - ४ व ११ डिसेंबर
१२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस - ८, ९, ११ व १२ डिसेंबर
१२१०२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस - १०, ११, १३ व १४ डिसेंबर
२०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस - ४, ७ व ११ डिसेंबर
२०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस - ७, १२ व १४ डिसेंबर
२०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस - ९ डिसेंबर
२०८२१ पुणे - संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस - ११ डिसेंबर

Web Title: Seven trains including LTT-Hatia Express running on Akola route cancelled; Block between 8th to 11th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.