अकोला मार्गे जाणाऱ्या एलटीटी-हटीया, कामाख्या एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द
By Atul.jaiswal | Published: October 9, 2023 06:46 PM2023-10-09T18:46:41+5:302023-10-09T18:47:07+5:30
दक्षिण-पूर्व रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२८६९ सीएसएमटी-हावड़ा एक्स्प्रेस ८ व १५ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
अकोला : दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राउरकेला स्टेशन यार्ड येथे तिसऱ्या लाईनच्या करिता यार्ड रीमॉडेलिंगसाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे मुंबई-हावडा या मार्गावरील सात गाड्या ८ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या अकोला स्थानकावरून जाणाऱ्या असल्यामुळे अकोलेकर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
दक्षिण-पूर्व रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२८६९ सीएसएमटी-हावड़ा एक्स्प्रेस ८ व १५ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १२८७० हावड़ा-सीएसएमटी एक्स्प्रेस ६ व १३ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. २२५११ एलटीटी - कामाख्या एक्स्प्रेस १७ ऑक्टोबर रोजी, तर २२५१२ कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर रोजी, तर १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस १३ ऑक्टोबर रोजी धावणार नाही.
२२८४५ पुणे - हटिया एक्स्प्रेस ८ व ११ ऑक्टोबर रोजी, तर २२८४६ हटिया - पुणे एक्स्प्रेस ९ व १३ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. २०८११ पुणे-संतरागाछी एक्स्प्रेस १६ ऑक्टोबर रोजी, तर २०८२२ संतरागाछी-पुणे एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी धावणार नाही. २२८९३ शिर्डी-हावड़ा एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी तर २२८९४ हावड़ा-शिर्डी एक्स्प्रेस १२ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १३४२५ मालदा टाउन-सूरत एक्स्प्रेस ७ व १४ ऑक्टोबर रोजी, तर १३४२६ सूरत-मालदा टाउन एक्स्प्रेस १६ ऑक्टोबर रोजी धावणार नाही.