विस्फोटक सामग्री नेणाऱ्या तिघांना सात वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 10:30 PM2019-11-14T22:30:58+5:302019-11-14T22:31:23+5:30
विस्फोटक सामग्री नेणाऱ्या तिघांना सात वर्षांची शिक्षा
Next
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : पातूर मार्गे ट्रॅक्टरमधून स्फोटक जिलेटिन आणि डिटोनेटर घेऊन जाणाºया तिघांना ९ मे २००० रोजी बार्शीटाकळी पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून, तिन्ही आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २००० मध्ये तत्कालीन एसीपी संतोष रस्तोगी यांच्याकडे बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. ९ मे २००० रोजी रस्तोगी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरजे ०६६ आर ३४८१ क्रमांकाचा ट्रॅक्टर पातूर मार्गे अटकली शिवार मार्गावरून जात होता. ट्रॅक्टरचा चालक हा सीट मागे स्फोटक जिलेटिन आणि डिटोनेटर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सहकाºयांच्या मदतीने ट्रॅक्टरवर छापा टाकला होता. ट्रॅक्टरची झडाझडती घेत असताना पोलिसांना सीटच्या मागील बाजूस दोन लोखंडी पेट्यांमध्ये ८० नग जिलेटीन तसेच १५० नग डिटोनेटर आढळले होते. ट्रॅक्टर चालक रतनलाल दलाजी बेरवा (रा. ग्राम तुका भिलवारा) याची चौकशी केली असता, त्याच्याकडे स्फोटक पदार्थांचे दस्तऐवज नव्हते. स्फोटक साहित्याचे दस्तऐवज भिलवारा येथील दाडिया गावातील रहिवासी हरफूल चौधरी व रतनलाल सोहन चौधरी यांचे असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चालकासह इतर दोघांनाही ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधिकाºयांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची गुरुवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना कलम (बी (१)मध्ये दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड आणि कलम अ, ए मध्ये सात वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे अॅड. श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.