अ‍ॅसीड हल्ल्याची धमकी देणाऱ्या युवकास सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:57 PM2019-12-18T18:57:42+5:302019-12-18T18:57:49+5:30

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाºया युवकास जिल्हा सत्र न्यायालधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Seven years in prison for threatening acid attack | अ‍ॅसीड हल्ल्याची धमकी देणाऱ्या युवकास सात वर्षांचा कारावास

अ‍ॅसीड हल्ल्याची धमकी देणाऱ्या युवकास सात वर्षांचा कारावास

Next

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक मुलगी शिकवणी वर्गाला जात असतांना तीला रस्त्याच्या मधोमध अडवून प्रेमाची मागणी घातल्यानंतर तीने नकार देताच या अल्पवयीन मुलीच्या चेहºयावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणाºया युवकास जिल्हा सत्र न्यायालधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. चंदू उर्फ नागसेन अशोक धांडे असे आरोपीचे नाव असून त्याने रस्त्यातच मुलीचा विनयभंग केला होता तर मुलीच्या आई वडीलांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती.
१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी २३ एप्रिल २०१३ रोजी तिच्या मैत्रीणीसोबत शिकवणी वर्गातून घरी जात असताना आरोपी चंदू धांडे याने मुलीचा पाठलाग करून तीच्यासमोर रस्त्यात गाडी आडवी के ली. त्यानंतर या मुलीचा हात धरून विनयभंग केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला प्रेमाची मागणी घातली. आणि प्रेमास नकार दिला तर तीच्या आई-वडिलाना जीवाने मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर अल्पवयीन मुलीला तीच्या मैत्रीनीसमोरच चेहºयावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देउन जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून खदान पोलिसांनी आरोपी चंदु धांडे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ (अ), ५०६ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ७,८,११ व १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. खदान पोलिस ठाण्याचे तत्कालीन हेड कॉन्स्टेबल सुभाष पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. हा खटला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयासमोर चालल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा व सरकारी वकील राजेश अकोटकर यांनी सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने दोषी चंदू उर्फ नागसेन अशोक धांडे याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अ नुसार दोषी ठरवीले. तर कलम ५०६ अन्वये सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले. तर पॉस्को कायद्याच्या कलम ७,८,११ व १२ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेश अकोटकर यांनी कामकाज पाहीले.

 

Web Title: Seven years in prison for threatening acid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.