चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास सात वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:22 PM2018-11-30T18:22:09+5:302018-11-30T18:22:34+5:30
अकोला: बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर २०१५ मध्ये तोंड दाबून बलात्कार करणाऱ्या नराधमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला: बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर २०१५ मध्ये तोंड दाबून बलात्कार करणाऱ्या नराधमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. संतोष गौतम बरडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी एक वर्षांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक ९ वर्षीय चिमुकली २ फेब्रुवारी २०१५ रोजी घराजवळील एका धार्मिक स्थळाजवळ मैत्रींनीसोबत खेळत होती. तीला सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान लघुशंका आल्याने धार्मिक स्थळामागे असलेल्या एका झाडाजवळ गेली असता अंधाराचा फायदा घेत आरोपी संतोष गौतम बरडे याने तीला उचलून अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर या चिमुकलीचे तोंड दाबून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. काही वेळातच सदर घटना गावात वाºयासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थानी पिंजर पोलिस स्टेशन गाठून गुन्हेगार संतोष गौतम बरडे याच्याविररुध्द तक्रार दिली. पिंजर पोलिसांनी त्याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपास पुर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले तसेच सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेश आकोटकर यांनी भक्कमपुरावे सादर करीत बाजू मांडल्याने न्यायालयाने आरोपी संतोष बरडे याला कलम ३७६ अन्वये सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडातील ४ हजार रुपयांची रक्कम पिडीत चिमुकलीस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहीले. तर तपास शिरभाते यांनी केला होता.