सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:42 PM2018-11-14T12:42:50+5:302018-11-14T12:43:08+5:30
सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गत काही दिवसांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या माहितीचे संकलन सुरू आहे.
अकोला: सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गत काही दिवसांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या माहितीचे संकलन सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ४00 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील पदांची माहिती शासनाला सादर केली जाणार आहे.
यापूर्वी शासनाने राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांची माहिती मागविली होती; परंतु या माहितीमध्ये बºयाच प्रमाणात त्रुटी आणि माहितीचा अभाव असल्यामुळे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण संचालनालयाच्या कार्यक्षेत्रात येणारी १ जानेवारी २0१६ आणि १ सप्टेंबर २0१७ रोजी मंजूर व कार्यरत पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मंजूर व कार्यरत प्रत्येक पदाची एकूण संख्या, निरंक किंवा व्यपगत पदे शिक्षकेतर संवर्गातील मंजूर पदे संख्या २0१२-१३ च्या संचमान्यतेनुसार संकलन करण्याचे काम माध्यमिक विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडून सुरू आहे. शाळांना तातडीने पदांची माहिती मागितली असून, माहिती संकलन झाल्यानंतर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ही माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे.
युद्धपातळीवर शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर पदांचे माहिती संकलन सुरू आहे. पदांची माहिती तातडीने पाठविण्यासंदर्भात शासनाकडून विचारणा झाली असून, आम्ही येत्या तीन ते चार दिवसांमध्ये माहितीचे संकलन करून शासनाकडे सादर करू.
सतीश मुगल, अधीक्षक,
वेतन व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक.