अकृषक जमिनींचे सातबारा पुनशरेधन अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:00 AM2017-09-28T02:00:11+5:302017-09-28T02:03:52+5:30
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्यावतीने ऑनलाइन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतजमिनींच्या सात-बारांचे संगणकीकरण करून पुनशरेधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सात-बारांची पुनशरेधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांतील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे आता केवळ मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आणि कारंजा तालुक्यातील पाच मिळून केवळ सहा गावांतील पुनशरेधनाचे काम उरले असून, ही प्रक्रिया येत्या २ दिवसांत पूर्ण करण्याचा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय भूमिलेख अद्ययावतीकरण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत सात-बारा, सहा ‘ड’ व आठ ‘अ’ स्कॅन करुन डाटा एण्ट्री करण्यात वाशिम जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात असलेले स्कॅन करून सीडी तयार करण्यात आल्या. पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे त्या पाठविण्यात आल्या. सीडीमधील दस्तऐवज या कार्यालयाने शासनाच्या ‘महाभुलेख महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. त्यानंतर अकृषक जमिनींच्या सात-बारांचे पुनशरेधनही वेगात सुरू आहे.
वाशिम जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय
शासनाच्या भूमिअभिलेख अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती आणि सूचना अधिकार्यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाच्या कर्मचार्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीच आहे. यापूर्वी शेतीच्या सात-बारांचे अद्ययावतीकरण वेगाने पूर्ण करून महसूल प्रशासनाचे प्रशस्तीपत्रक वाशिम जिल्ह्याने पटकावले असून, आता अकृषक जमिनींच्या अद्ययावतीकरणाचे कामही करण्यात वाशिम जिल्हा आघाडीवर आहे. येत्या दोन, चार दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.