भरपावसाळ्यात अंदुरा येथे भीषण पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:41+5:302021-07-30T04:19:41+5:30

दुसरीकडे आठवड्यापासून जलवाहिनी वाहून गेल्याने जलवाहिनी शोधून खोदकाम करण्याची तसदीसुद्धा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कर्मचारी घेत नसल्याने, त्यांची हलगर्जी स्पष्टपणे ...

Severe water shortage in Andura during monsoon season! | भरपावसाळ्यात अंदुरा येथे भीषण पाणीटंचाई!

भरपावसाळ्यात अंदुरा येथे भीषण पाणीटंचाई!

Next

दुसरीकडे आठवड्यापासून जलवाहिनी वाहून गेल्याने जलवाहिनी शोधून खोदकाम करण्याची तसदीसुद्धा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कर्मचारी घेत नसल्याने, त्यांची हलगर्जी स्पष्टपणे दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

गत आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्ण जिल्ह्यातील नदी-नाल्यांना मोठे पूर आल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली होती. अंदुरा परिसरातून वाहत असलेल्या मोर्णा व पानखास नदीला आलेल्या पुरात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कारंजा रम येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. जलवाहिनी वाहून गेल्याने या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या अंदुरा व सोनाळा गावात भरपावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ

गत आठवड्यात मोर्णा व पानखास नदीला आलेल्या पुरात जलवाहिनी वाहून गेल्याने या गावातील नागरिकांना भरपावसाळ्यात चिखल तुडवीत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मिळेल तिथून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी ग्रामस्थांना दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

पंचायत समिती सभापतींनी केली कर्मचाऱ्यांची कानउघाडणी

गत आठवड्यापासून या गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पंचायत समिती सभापतींंचे पती मंगेश गवई हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता, पाणीटंचाईची माहिती मिळताच, मंगेश गवई यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कारंजा रम येथील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Web Title: Severe water shortage in Andura during monsoon season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.