सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:14+5:302021-02-23T04:28:14+5:30
गावातील गटारे, नाल्या तुडूंब भरल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्याच रस्त्यावरून लहान मुले, ग्रामस्थांचे येणे जाणे असते. ...
गावातील गटारे, नाल्या तुडूंब भरल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्याच रस्त्यावरून लहान मुले, ग्रामस्थांचे येणे जाणे असते. याच घाणीमध्ये डुकरे फिरत असून, पूर्ण घाण रस्त्यावर दिसून येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या घाणीमुळे दुर्गंधी होऊन डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित प्रशासन, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन गावातील नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी सोफी चौकातील ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अफतार व सलीम भाई यांनी केली आहे. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात घाणीचे पाणी वाहात आहे. या सांडपाण्याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा व आठवडी बाजारात स्वच्छता ठेवावी, अशी मागणी शेख सलीम शेख रहुल्ला यांनी केली.
....................
तीन दिवसांपूर्वी सरपंच म्हणून पदभार घेतला. तक्रार प्राप्त झाल्यास सांडपाणी समस्या दूर करण्यात येईल. शिवजयंती निमित्ताने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.
मेजर मंगेश तायडे, सरपंच, वाडेगाव