लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:08 AM2020-09-20T11:08:52+5:302020-09-20T11:09:09+5:30
अनेक वेळा अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितीने पोलिसांत दिली.
मूर्तिजापूर : शहरातील एका ३२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तिचा लैंगिक छळ करून अनेक वेळा अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितीने पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप दिवाकर गावंडे याने पीडित युवतीचा पाठलाग करून तिच्यासोबत लगट निर्माण केली. लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने अतिप्रसंग केला. पीडितीने आरोपीस वारंवार लग्नासाठी विनवणी करूनसुद्धा नकार दिला. ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे (२९) व दिवाकर गावंडे (६५) यांनी युवतीच्या घरी जाऊन तिचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केली, अशा तक्रारीवरून पोलिसांनी संदीप दिवाकर गावंडे (३२), ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे (२९) व दिनकर गावंडे (६५) या तिघांविरुद्ध कलम ३५४ ड, ३७६, ३७७, ४५२, ५०६ सहकलम अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.