बालकावर लैंगिक अत्याचार: आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:43 PM2018-12-09T13:43:40+5:302018-12-09T13:43:48+5:30

अकोट : अकोट येथील आॅटोचालकाने एका १५ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली.

Sexual harassment of the child: Police custody of the accused | बालकावर लैंगिक अत्याचार: आरोपीस पोलीस कोठडी

बालकावर लैंगिक अत्याचार: आरोपीस पोलीस कोठडी

googlenewsNext

अकोट : अकोट येथील आॅटोचालकाने एका १५ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक करून १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेतली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट येथील आरोपी म. वसीम म. शफी याने एक १५ वर्षीय मुलगा आटा आणण्याकरिता दुकानावर जात असताना त्याला आपल्या एमएच ३० पी ५६७१ क्रमांकाच्या आॅटोमधून सोडतो असे सांगून आॅटोमध्ये बसविले. त्यानंतर आॅटो पोपटखेड मार्गावरील संत्रामंडी गोदामाजवळ नेऊन त्या ठिकाणी बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेसंदर्भात पीडित मुलाच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी म. वसीम म. शफी याच्याविरुद्ध भादंवि ३७७ व पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला इफ्तेखार प्लॉट येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची कारवाई अकोट शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Sexual harassment of the child: Police custody of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.