लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण
By admin | Published: March 18, 2015 01:24 AM2015-03-18T01:24:28+5:302015-03-18T01:24:28+5:30
बाश्रीटाकळी येथील युवकाविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
कारंजा लाड (जि. वाशिम): लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी वारंवार संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी येथील युवकाविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कारंजा येथील २६ वर्षीय पीडित युवतीने कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की, बाश्रीटाकळी येथील मोहम्मद रजा मोहम्मद रफिक ऊर्फ राजा (३0) हा कारंजा येथे अधुनमधून त्याच्या नातेवाइकाकडे येत होता. त्याच्या नातेवाइकाच्या घराशेजारीच राहणार्या पीडित युवतीशी त्याचे सूत जुळले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून ियुवतीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले; परंतु लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित युवतीने आरोपी मोहम्मद रजा मोहम्मद रफिक याच्याविरुध्द लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. या तक्रारीवरुन कारंजा शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (१)(२) (न), ४१७ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कारंजा पोलीस अधिक तपास करीत आहे.