टिळक रोड लैंगिक अत्याचार; प्रमुख आरोपी गजाआड

By admin | Published: April 18, 2017 01:40 AM2017-04-18T01:40:48+5:302017-04-18T01:40:48+5:30

अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर दहा वर्षीय मुलीवर कुकर्म करणाऱ्या प्रमुख आरोपींना सोमवारी उशिरा सायंकाळी अटक करण्यात आली.

Sexual torture on Tilak Road; The main accused GajaAad | टिळक रोड लैंगिक अत्याचार; प्रमुख आरोपी गजाआड

टिळक रोड लैंगिक अत्याचार; प्रमुख आरोपी गजाआड

Next

अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर दहा वर्षीय मुलीवर कुकर्म करणाऱ्या प्रमुख आरोपींना सोमवारी उशिरा सायंकाळी अटक करण्यात आली; परंतु पोलिसांनी आरोपींची नाव सांगण्यास नकार दिला असून, मंगळवारी आरोपींची नावे जाहीर करू, असे स्पष्ट केले.
शनिवारी जुने शहरातील एका दहा वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर नेले. येथील निर्जनस्थळी तिच्यावर नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून येथील व्यापाऱ्यांच्या तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब लक्षात आली. रामदासपेठ पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
आरोपींची धरपकड सुरू केली. संशयितांना ताब्यात घेत, त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध भिकारी गोविंद साखरे याला अटक केली. दरम्यान, पोलिसांच्या तपासाने अचानक दिशा बदलल्यानंतर महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले.
त्यापैकी दोन युवक हे लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही युवकांची कसून चौकशी सुरू आहे.
या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी आरोपींबाबत माहिती देण्यास नकार दिला असून, योग्यवेळी आरोपींची नावे स्पष्ट करू, असे सांगितले.

Web Title: Sexual torture on Tilak Road; The main accused GajaAad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.