‘ऑपरेशन मुस्कान’मुळे १९१ मुलं पालकांच्या छायेत
By admin | Published: August 3, 2015 01:51 AM2015-08-03T01:51:18+5:302015-08-03T01:51:18+5:30
विशेष मोहिमेत १९७ मुलांचा शोध, अकोला पोलिसांची यशस्वी कामगिरी.
सचिन राऊत / अकोला: रागात घर सोडून गेलेल्या, बेपत्ता झालेल्या आणि जबरदस्तीने कामावर लावलेल्या मुलांच्या शोधासाठी राज्याच्या गृहखात्यामार्फत राबविण्यात आलेल्या ह्यऑपरेशन मुस्कानह्ण या विशेष मोहिमेत अकोला पोलिसांनी यशस्वी कामगिरी करीत तब्बल १९७ मुला-मुलींचा शोध घेतला. यामध्ये उत्तराखंड, मध्य प्रदेश व इतर राज्यातील मुलं या पथकाने शोधले असून, त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीनही करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात जिल्हय़ातील ६ पोलीस अधिकार्यांसह ३६ पोलीस कर्मचार्यांनी रात्रं-दिवस मुलांचा शोध घेतला असून, त्याचेच फलित म्हणून १९७ बेवारस मुलांच्या चेहर्यावर ह्यमुस्कानह्ण फुलविण्याचे काम जिल्हय़ाच्या पोलीस खात्याने केले आहे. राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आले असून, यामध्ये बेवारस, बेपत्ता, रागात घर सोडून गेलेल्या मुलांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना आई-वडील, नातेवाईक तसेच महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात १ ते ३१ जुलै या कालावधीत ह्यऑपरेशन मुस्कानह्ण राबविण्यात आले. अकोला पोलिसांनी राबविलेल्या या ऑपरेशनमध्ये एकूण १९७ मुलांचा शोध घेण्यात आला. यामधील १९१ मुल-मुली आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले, तर ६ मुलांचे आई-वडील न मिळाल्याने त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करून बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस रेकॉर्डनुसार ३१ मुलांची बेपत्ता असल्याची नोंद असून, यामधील १६ मुलांचा शोध घेण्यात या पथकाला यश आले आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या या ऑपरेशनचा रोजचा अहवाल घेण्यात आला असून, तो पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.