शहापूर(वाघोडा) प्रकल्प ओव्हरफ्लो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:52+5:302021-09-10T04:25:52+5:30
साधारणपणे चार-पाच वर्षाआधी हा बृहृत प्रकल्प बांधून तयार झाला होता. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे तो भरला नव्हता. गतवर्षी या प्रकल्पात ...
साधारणपणे चार-पाच वर्षाआधी हा बृहृत प्रकल्प बांधून तयार झाला होता. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे तो भरला नव्हता. गतवर्षी या प्रकल्पात ९० टक्के जलसंचय झाला. परंतु हा प्रकल्प यावर्षीच्या शेवटच्या दमदार पावसामुळे शंभर टक्के क्षमतेने भरला. सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे. हे नैसर्गिक दृश्य पहायला परिसरातील सावरा, मंचनपूर, देऊळगाव, धामणगाव, पणज, वडाळी देशमुख, रंभापूर, चंडिकापूर तसेच काही अमरावती जिल्ह्यातील लगतच्या गावातील नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.
फोटो:
शेकडो हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार
प्रकल्पामुळे आसेगाव बाजार जि.प. सर्कल मधील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे. तसेच भविष्यात शासनाने जर या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचा फिल्टर प्लांट बसवला तर अकोट तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोयदेखील होऊ शकते.