अकोला रेल्वे स्थानकावर शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 05:26 PM2022-01-20T17:26:33+5:302022-01-20T17:26:41+5:30

Shakuntala Railway's birthday celebration at Akola railway station : गुरुवार, २० जानेवारी रोजी अकोला स्थानकावर शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Shakuntala Railway's birthday celebration at Akola railway station | अकोला रेल्वे स्थानकावर शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा

अकोला रेल्वे स्थानकावर शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा

googlenewsNext

अकोला : तब्बल १०८ वर्षांपूर्वी मुर्तीजापूर ते अचलपूर या मार्गावर धावलेल्या नॅरोगेज शकुंतला रेल्वेची चाके आज जरी थांबली असली, तरी ही गाडी पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या शकुंतला बचाव सत्याग्रहाचा एक भाग म्हणून गुरुवार, २० जानेवारी रोजी अकोला स्थानकावर शकुंतला रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांनी 'गोपाला गोपाला सुरु करा ही शकुंतला' ही कविता रचून आपल्या खड्या आवाजात सादर केली.

अकोला रेल्वे स्थानकावर दर्शनीय स्थळी स्थापलेल्या शकुंतला रेल्वे इंजिनला फुलांचे हार घालून सजविण्यात आले. शकुंतला बचाव आंदोलनाचे झेंडे-बॅनर लावण्यात आले. विजय विल्हेकर यांनी शकुंतला बचाव सत्याग्रहाची भूमिका विशद करतांना अकोला रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी शासनाने १५० कोटी खर्च केले.मग गोरगरिबांच्या शकुंतला रेल्वे साठी १०० कोटीं खर्च करून रेल्वे सुरु करावी अशी शासनाला विनंती केली. कृष्णा अंधारे यांनी या सत्याग्रहाला अकोलेकरांची समर्थ साथ असल्याची ग्वाही दिली. यावेळी 'शकुंतला गाडी गरिबांची नाडी', शकुंतला रेल्वे सुरु झालीच पाहिजे अशा घोषणा सत्याग्रहींनी दिल्या. या वाढदिवस कार्यक्रमाला मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे, रेल्वे पूल तंत्रज्ञ रामदास चव्हाण, विजय लाजूरकर, चंद्रकांत झटाले, धनंजय मिश्रा, सौ.अरुणाताई चव्हाण, सौ.सिंधुताई विल्हेकर,सौ सीमाताई टागोर, नितीन झटाले सहभागी होते.

 

यवतमाळ ते अचलपूरपर्यंतच्या स्थानकांवर होणार ध्वजसंचलन

             येत्या २६ जानेवारी २०२२ गणतंत्र दिनी, यवतमाळ ते अचलपूर सर्व रेल्वे स्थानकावर, शकुंतला रेल्वेच्या लोकतंत्रि स्वातंत्र्या साठी, ध्वज संचलन व डॉ विठ्ठल वाघ रचित शकुंतला रेल्वे स्वातंत्र्याचे गीत गायन होणार आहे. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर २६ जाने २०२२ ला ध्वज संचलन होणार असून,यवतमाळ रेल्वे स्थानकावर छोट्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, तसेच अचलपूर रेल्वे स्थानकावर, तीनशे फुटी राष्ट्रीय ध्वज, रेल्वे रुळावरून चालविण्यात येणार,तसेच नॅरोगेज रेल्वे निर्मितीचे मुख्य ठिकाणी परेल मुंबई ला ध्वज संचलन करणार असल्याची माहिती विजय विल्हेकर यांनी दिली.

Web Title: Shakuntala Railway's birthday celebration at Akola railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.