‘शकुंतला’ करणार आज विश्राम!

By admin | Published: January 12, 2017 02:14 AM2017-01-12T02:14:21+5:302017-01-12T02:14:21+5:30

तांत्रिक अडचणींमुळे लेकुरवाळय़ा ‘शकुंतलेला’ गुरुवारी एक दिवसाची विश्रांती देण्यात आली आहे.

'Shakuntala' to rest today! | ‘शकुंतला’ करणार आज विश्राम!

‘शकुंतला’ करणार आज विश्राम!

Next

अकोला, दि. ११- कधीकाळी वर्‍हाडवासीयांची लाइफलाइन समजली जाणारी शकुंतला रेल्वे गाडी थकली असून, शंभर वर्षांंपेक्षाही अधिक काळ लोटल्यामुळे जागोजागी ढासळत चाललेला रेल्वे मार्ग आणि वारंवार उद्भवणार्‍या इतर तांत्रिक अडचणींमुळे मूर्तिजापूर-यवतमाळदरम्यान धावणार्‍या लेकुरवाळय़ा 'शकुंतलेला' गुरुवारी एक दिवसाची विश्रांती देण्यात आली आहे.
डीझल इंजिनच्या साहाय्याने धावत असलेल्या 'शकुंतले'ला मूर्तिजापूर ते यवतमाळ हे ११२ कि.मी. अंतर कापण्यासाठी सात तास लागतात. किनखेड, विळेगाव, भडशिवणी, पोही, कारंजा लाड, सोमठाणा, सांगवी, वरूडखेड, दारव्हा, तपोना, लाडखेड, लासिनासह आसपाच्या इतर वर्‍हाडवासीयांना अंगाखांद्यांवर घेऊन धावणार्‍या शकुंतलेचा ११२ वर्षांंहून अधिक काळ उलटला आहे. या कालखंडात एकदाही न बदललेल्या नॅरोगेज रेल्वे मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वातावरणातील बदलांमुळे तो जागोजागी जीर्ण झाला आहे. लोहमार्गाच्या दुरुस्तीचे कारण स्पष्ट करीत, गुरुवारी एक दिवसाकरिता ५२१३१/५२१३२ मूर्तिजापूर-यवतमाळ-मूर्तिजापूर ह्यशकुंतलाह्ण पॅसेंजर रद्द करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील जनसंपर्क अधिकार्‍यांनी ह्यलोकमतह्णला दिली.

Web Title: 'Shakuntala' to rest today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.