कृषी कायद्यांविरोधात शंभू सेनेने दिले धरणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:50+5:302020-12-15T04:34:50+5:30
अकोला : शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शंभू सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...
अकोला : शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शंभू सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन, तीन कृषी कायदे रद्द करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, सर्व शेतमालास हमीभाव देण्यात यावा, हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी गुन्हा ठरविण्यात यावा, किमान हमीभावाचा कायदा करण्यात यावा, कृषिक्षेत्रात भांडवलदारांना मनाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शंभू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात शंभू सेनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन नवले, अतुल पाटील, संतोष बावस्कर, संतोष दुतोंडे, सचिन आगाशे, किशोर गाडगे, गणेश गोगे, गजू नागलकर, अक्षय गंगलवार, नितीन गंगलवार, राजू शिंदे, नीलेश भोसले, अक्षय गावंडे, अनिकेत दामोदर, अजिंक्य दामोदर, राहुल कोल्हटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
...................फोटो...............