जलयुक्त शिवार अभियानाची कामे प्रामाणिकपणे करावीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 07:37 PM2017-10-11T19:37:02+5:302017-10-11T19:40:16+5:30
अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील कार्य हे ईश्वरीय कार्य असून, सदर काम प्रामाणिकपणे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील कार्य हे ईश्वरीय कार्य असून, सदर काम प्रामाणिकपणे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन सभागृहात ब्लॉक टेक्निकल रिसोर्स टीम व इतर अधिकार्यांकरिता जलसंधारणाच्या उपक्रमाच्या प्रशिक्षणाबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती उपजिल्हाधिकारी (रोहयो) अभयसिंह मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीराम कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलयुक्त शिवार अभियान हा मुख्यमंत्री यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून, मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा परिणाम आ ता दिसून येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय पुढे म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या कामाची सांगड घालून चातुर्याचा वापर करून अकुशल कामासोबत कुशल कामे करून घ्यावी, असे सांगितले.
आज कार्यशाळेत होणारे मार्गदर्शन लोकांपर्यत पोहोचवून आ पली नैतिक जबाबदारी पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरीत्या राबविल्यामुळे राष्ट्रसेवेसोबत समाजसेवा घडणार आहे. या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध असून, निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गावातील जलसंधारणाच्या कामाचा कृती आराखडा तयार कर ताना गावातील तरुणांना विश्वासात घेऊन स्मार्ट फोनचा वापर करून गुगल अँपच्या मॅपद्वारे त्यांना गावाचा नकाशा दाखवून जलयुक्त शिवार अभियानात कामाचा कृती आराखडा तयार करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहयोचे कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर आगरकर, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, कार्यक्रम व्यवस्थापक सुनील वाघमारे, आशिष उमाळे यांनी परिश्रम घे तले. या कार्यशाळेला तहसीलदार रवी काळे, श्री पुंडे, विश्वनाथ घुगे, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उ पअभियंता लघुसिंचन, वन परिक्षेत्र अधिकारी आदी उपस्थित होते.