शंकराचार्य स्वामी निश्चलानंद २६ डिसेंबर रोजी अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 02:21 PM2018-12-23T14:21:32+5:302018-12-23T14:21:56+5:30
अकोला: जगन्नाथपुरी येथील पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचे सहा शिष्यांसह २६ डिसेंबर रोजी राजेश्वर नगरीत प्रथमच आगमन होत आहे.
अकोला: जगन्नाथपुरी येथील पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचे सहा शिष्यांसह राजेश्वर नगरीत प्रथमच आगमन होत आहे. श्री जगद्गुरू शंकराचार्य स्वागत समिती व खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या आगमनानिमित्त आशीर्वचन व संगोष्ठी सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोपाल खंडेलवाल, सचिन लटुरिया व प्रा. विवेक बिडवई यांनी दिली.
अकोला मुक्कामात जगद्गुरू शंकराचार्य यांचे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. २६ डिसेंबर रोजी शंकराचार्य यांचे भोपाळ येथून रेल्वेने अकोल्यात आगमन होणार आहे. त्यांचा मुक्काम दत्त कॉलनी येथे राहणार आहे. २७ डिसेंबर रोजी आशीर्वचन सोहळा होईल. या कार्यक्रमात श्रीमद गोवर्धनमठ पुरी पिठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज भाविकांना ज्ञान-विज्ञान-धर्म यावर मार्गदर्शन करणार आहेत. २७ डिसेंबर रोजी आमंत्रित भाविकांसाठी संगोष्ठी कार्यक्रम होणार असून, ‘बदलत्या सामाजिक परिवेशात धर्माचरणाचे स्वरू प’ या विषयावर मार्गदर्शन करतील, तसेच आदर्श गोसेवा प्रकल्प म्हैसपूर येथे भेट देतील. २८ डिसेंबर रोजी नागरिक व भक्तांना दर्शन व आशीर्वाद सोहळा होईल. तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगद्गुरू शंकराचार्य स्वागत समिती, खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्ट, रुद्र सप्तशती मंडळ जठारपेठ, गीता स्वाध्याय मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ता प्रयत्नशील आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.