बाळापूर तालुक्यातील पारस येथील शंकरपट पोलिसांनी उधळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:42 AM2018-02-19T02:42:06+5:302018-02-19T02:42:18+5:30

अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथे सुरू असलेला शंकरपट पोलिसांनी रविवारी दुपारी उधळून लावला. प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देत असल्याचा आरोप करीत पोलिसांनी तिघांना अटक करून, त्यांच्याकडून पावत्यांसह रोख रक्कम जप्त केली. 

Shankarpot police in Paras in Balapur taluka escapes! | बाळापूर तालुक्यातील पारस येथील शंकरपट पोलिसांनी उधळला!

बाळापूर तालुक्यातील पारस येथील शंकरपट पोलिसांनी उधळला!

googlenewsNext
ठळक मुद्दे प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणार्‍या तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथे सुरू असलेला शंकरपट पोलिसांनी रविवारी दुपारी उधळून लावला. प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देत असल्याचा आरोप करीत पोलिसांनी तिघांना अटक करून, त्यांच्याकडून पावत्यांसह रोख रक्कम जप्त केली. 
पारस येथील धानोरा रस्त्याच्या बाजूच्या शेतात ‘जय किसान बैलपट’ शनिवारपासून सुरू झाला होता. या बैलपटाची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली असताना रविवारी दुपारी सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद वाघमोडे यांनी पथकासह धाड टाकली. तेथे पोलिसांना ई-क्लास जमिनीवर ३0 ते ४0 शर्यतीसाठी आणलेले बैल व पाच रिंगी आढळल्या. तसेच काही इसम बैलांना रिंगीला जुंपून त्यांना काठीने मारून शर्यत लावताना दिसले. पोलिसांना पाहताच ते पळून गेले. घटनास्थळावर बैल मालकांना पावत्या देत असलेला इब्राहीम खॉ शहादत खॉ यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्यासोबत नारायण बागाजी खंडारे व सदाशिव चंद्रअप्पा कारनकर यांनी या पटाचे आयोजन केले असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करून गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 

Web Title: Shankarpot police in Paras in Balapur taluka escapes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.