निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट रस्त्यावर
By आशीष गावंडे | Published: February 7, 2024 07:50 PM2024-02-07T19:50:38+5:302024-02-07T19:51:17+5:30
गांधी जवाहर बागेत केली निदर्शने.
आशिष गावंडे, अकाेला: शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी जवाहर बागेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमाेर जोरदार निदर्शने केली. यावेळी आमचा श्वास... आमचा ध्यास... शरद पवार, शरद पवार; आमचा पक्ष, आमचे चिन्ह .. शरद पवार अशा घोषणा देत; आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष रफिक सिद्दीकी यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी गांधी जवाहर बागेत निवडणुक आयाेगाच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. यावेळी "आमचा पक्ष.. शरद पवार; आमचे चिन्ह.. शरद पवार; देशाचा बुलंद आवाज.. शरद पवार" अशा घोषणा दिल्या.
यावेळी कार्याध्यक्ष सय्यद युसुफ अली, ज्येष्ठ नेते तथा उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी, नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजकुमार मुलचंदानी, माजी महानगर अध्यक्ष अजय तापडिया, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, देवानंद ताले, युवक महानगराध्यक्ष करण दोड, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर गावंडे, राजेश मंगळे, परिमल लहाने, शामराव वाहूरवाघ, गोपाळराव कडाळे, डॉ. तेजराव नराजे, श्रीधर मोरे, हिदायत खा रूम खा उर्फ इदु पैलवान, रमेश खंडेलवाल, जि. प. सदस्य नरेश विल्हेकर, शेख अजीज, जमील खान, जिल्हा महासचिव विद्या अंभोरे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे, ज्योती कुकडे, कोकीळा वाहूरवाघ, सरला वरघट, सीमा अंभोरे, चंदा चव्हाण, रेखा वरघट, रोशनी लकडे, शिल्पा जोगी, गजानन भटकर, प्रा. बिस्मिल्ला खान, अक्षय भगवर, शिवाजी पटोकार, सचिन निंबोकार, डॉ. अविनाश गावंडे, अहमद खान, सय्यद शाकीर हुसेन, गुड्डू पैलवान, फिरोज खान, राजेश राऊत, संतोष मुळे, शैलेश बोदडे, गोपाळराव कडाळे, पुरुषोत्तम मांगटे, किशोर राजूरकर, शाम कोहर, अमोल शेंडे, शौकत अली शौकत, वसीम खान, बाबासाहेब भुमरे, प्रकाश सोनवणे, रुपेश कांबळे, प्रमोद बनसोड उपस्थित होते.