लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:58+5:302021-09-12T04:23:58+5:30

अकाेला : अनेक जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात; मात्र या मीडियाचा वापर करताना दक्षता न बाळगता कोणत्याही ...

Like, share, forward carefully; You have to eat the air of jail! | लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा !

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा !

Next

अकाेला : अनेक जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात; मात्र या मीडियाचा वापर करताना दक्षता न बाळगता कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करणे अंगलट येऊ शकते. या प्रकारातून शांतता बिघडविणाऱ्या, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला तुम्ही कळत नकळत लाईक, शेअर आणि फारवर्ड केले तर तुम्हाला जेलची हवा खावी लागण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट वाचून तिची योग्यता आणि समाजावर होणारे परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

अलीकडच्या दहा वर्षांत स्मार्टफोन अनेकांच्या हाती आला आहे. या स्मार्ट फोनवर व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाचा वापर सहज शक्य असल्याने अनेक जण वेळ घालविण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी या सोशल मीडियाचा मनसोक्त वापर करतात. या मीडियावर काही समाजभान नसलेले आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा आहे. ही मंडळी जहाल, तीव्र, भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शांतता भंग करणाऱ्या, वात्रट पोस्टच शेअर करण्यावर अधिक भर देते. यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून शेअर झाली, लाईक किंवा फॉरवर्ड झाली, तर तुमच्यावरही माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.

----------

सोशल मीडियाचा वापर सर्वांनी काळजीपूर्वक करावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, वात्रट, व्हल्गर पोस्टला लाईकही करू नये, या बाबीचे पालन केल्यास तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहू शकता.

विलास पाटील

प्रमुख दहशतवाद विराेधी कक्ष

मुलींनो डीपी सांभाळा

काही तरुणी व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावर आपले स्वत:चे छायाचित्र डीपी म्हणून ठेवतात; मात्र याच डीपीचा वापर करून सायबर गुन्हेगार अश्लील पोस्ट तयार करणे किंवा गैरवापर करून बदनामीचा प्रयत्नही करू शकतात. यामुळे तरुणींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असून, आपल्या छायाचित्राचा गैरवापर टाळण्यासाठी स्वत:चे छायाचित्र न ठेवता निसर्गचित्र, सुभाषितांची छायाचित्रे, ठेवणे कधीही योग्यच ठरते.

----------------

सोशल मीडियाचा वापर करा जपून

एफबी, व्हॉट्सॲप आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रक्षोभक, अश्लील मेसेजेस शेअर होतात. अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही व्हॉट्सॲप, फेसबुकचे जणू व्यसन लागले आहे. सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला जगाशी कनेक्ट होता येते, पण त्याचा अतिवापर टाळण्याची गरज आहे. माहितीची सत्यता पडताळून जर ती शेअर केली तर, लोकांना चांगली आणि योग्य माहिती मिळू शकते.

-------

अशी घ्या काळजी

सोशल मीडियाचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यप्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय एफबी किंवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे. एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जाऊ शकते. मेसेज शेअर किंवा लाइक करताना आपण काही चुकीचं पाठवत नाही ना, याचे भान आपणच राखले पाहिजे.

Web Title: Like, share, forward carefully; You have to eat the air of jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.