शिवसेनेला नाही शेतक-यांशी घेणे-देणे - गुलाबराव गावंडे

By Admin | Published: January 21, 2017 08:29 PM2017-01-21T20:29:55+5:302017-01-21T20:29:55+5:30

शिवसेना शेतक-यांच्याप्रती संवेदशिल नसून, शेतक-यांच्या वेदनेचे शिवसेनेला काही घेणे-देणे नसल्याचे टीकास्त्र माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी सोडले.

Sharing with Shivsena not to the farmers - Gulabrao Gavande | शिवसेनेला नाही शेतक-यांशी घेणे-देणे - गुलाबराव गावंडे

शिवसेनेला नाही शेतक-यांशी घेणे-देणे - गुलाबराव गावंडे

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 21- शिवसेना शेतक-यांच्याप्रती संवेदशिल नसून, शेतक-यांच्या वेदनेचे शिवसेनेला काही घेणे-देणे नसल्याचे टीकास्त्र माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी शनिवारी येथे सोडले. महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील यांची पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 
 
यावेळी उपस्थित माजी मंत्री गुलाबराव गावंडे पत्रकारांशी बोलत होते. सावकारी कायद्यानंतर राज्यातील शेतक-यांसाठी पाच कार्यक्रम आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते; मात्र शेतक-यांच्या दृष्टीने विषय काढला, त्याकडे दुर्लक्ष करीत दुसराच ते  विषय  काढायचे , असे सांगत शेतक-यांचे शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला.
 
राज्यातील शेतक-यांची ख-या अर्थाने तळमळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचेही गावंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, महानगराध्यक्ष अजय तापडिया यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
स्वगृही चाललो बरं...!
शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची भूमिका गुलाबराव गावंडे यांनी विशद केली. शिवसेनेपूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होतो, तेव्हा शरद पवार यांच्याशी संबंध आला. त्यामुळे मी स्वगृही चाललो बरं... असे सांगत गुलाबराव गावंडे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची भूमिका स्पष्ट केली.
 

Web Title: Sharing with Shivsena not to the farmers - Gulabrao Gavande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.