शताब्दी खैरे यांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:20+5:302021-05-03T04:14:20+5:30
मूर्तिजापूर : आंबेडकर चळवळीतील नेते ॲड. प्रा. मुकुंद खैरे यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे (२९) यांचे अकोला येथील खासगी ...
मूर्तिजापूर : आंबेडकर चळवळीतील नेते ॲड. प्रा. मुकुंद खैरे यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे (२९) यांचे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दिनांक २ में रोजी रात्री १ वाजता कोरोनामुळे निधन झाले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न ठरले होते.
नागपूर उच्च न्यायालयात वकील असलेल्या शताब्दी खैरे या अनेक दिवसांपासून अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत होत्या. २ मे रोजी रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. प्रा. मुकुंद खैरे यांनी ‘समाज क्रांती आघाडी’ या सामाजिक संघटनेची मुहूर्तमेढ मूर्तिजापुरात रोवली. ही संघटना उभी करण्यासाठी शताब्दी यांचा मोठा वाटा राहिला आहे. शताब्दी खैरे यांनी ‘एलएलएम’मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते. तसेच त्यांनी ‘बुध्दिस्ट लॉ’ नावाचे एक कायद्याचे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी समाज क्रांती आघाडीचे प्रा. मुकुंद खैरे यांच्यासोबत वयाच्या १० ते १२ व्या वर्षापासून काम केले. गत आठवड्यात कोरोनामुळे शताब्दी यांच्या आईचे निधन झाले. वडील प्रा. मुकुंद खैरे हे सुद्धा कोरोनाशी झुंज देत आहेत. शताब्दीच्या अकाली जाण्याने आंबेडकरी चळवळीतील एक निखरता तारा गमावल्याच्या शोक संवेदना अनेकांनी व्यक्त केल्या. (फोटो)