श्रावण सोहळ्यात सखी चिंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:58 AM2017-08-09T02:58:17+5:302017-08-09T02:59:46+5:30

अकोला : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे, हातावर रेखाटलेली एकापेक्षा एक सरस मेहंदी डिझाइन, सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते लोकमत आणि सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावण सोहळ्याचे.  

Shawlana sublimation chime! | श्रावण सोहळ्यात सखी चिंब!

श्रावण सोहळ्यात सखी चिंब!

Next
ठळक मुद्देपाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाखसंस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे, हातावर रेखाटलेली एकापेक्षा एक सरस मेहंदी डिझाइन, सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते लोकमत आणि सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावण सोहळ्याचे.  
गोरक्षण रोडवरील खंडेलवाल भवन येथे लोकमत सखी मंच आणि मेडिमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मेडिमिक्सचे आशिष चौरे, संजय देशमुख तसेच स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘गोठ’ या मालिकेतील राधा-रूपल नंद, विलास-समीर परांजपे त्याचप्रमाणे रिसो साईसबॅ्रन ऑइलचे नीलेश बोकटे, वाघ बकरी चहाकडून श्रीकांत शिंदे सोबतच प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ नरेंद्र लोहे, कार्यक्रमाच्या परीक्षिका प्रसिद्ध कथ्थक विशारद डॉ. वर्षा बाकरेकर व २0१६ सालच्या मिसेस इंडिया प्रणाली चतारकर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सहप्रस्तुतकर्ता स्टार प्रवाह व लाईफस्टाईल पार्टनर रिसो साईसब्रॅन ऑईल हे होते. या सोहळय़ात सखींचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसादाने मेडिमिक्स हर्बल फॅशन शो, उखाणे स्पर्धा, स्टार प्रवाहची महाराणी व रिसो राईसब्रॅन ऑईलच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे सौंदर्य तज्ज्ञ नरेंद्र लोहे यांनी श्रावणात त्वचेची घ्यावयाची काळजी, या विषयावर उपस्थित सखींना ब्युटी टिप्स दिल्या. सखींनी सर्व स्पर्धांंचा  यथेच्छ आनंद घेत भरपूर बक्षिसे जिंकली.

स्टार प्रवाह महाराणी
सहप्रायोजक स्टार प्रवाह अंतर्गत प्रश्नोत्तरे, उखाणे आदी विविध स्पर्धांद्वारे स्टार प्रवाहची महाराणी घोषित करण्यात आली. त्याचबरोबर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘गोठ’ मालिकेतील कलाकार समीर परांजपे (विलास) आणि रूपल नंद (राधा) यांची उपस्थिती श्रावण सोहळ्यास चारचॉँद लावून गेली. या कलाकारांनी सखींना मालिकेसंबंधी प्रश्न विचारून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली, तसेच मालिकेतील गमतीजमती, सेटवरील गमतीजमती, मालिकेतील आपली भूमिका आदी विविध विषयांवर संवाद साधला.

विजेते स्पर्धक (अंतिम निकाल)
- मेडिमिक्स हर्बल फॅशन शो : 
प्रांजली जयस्वाल (प्रथम), डिंपल वानखडे (द्वितीय), सूचिता सोनी (तृतीय)

मेडिमिक्स उखाणे स्पर्धा 
सोनल ठक्कर (प्रथम), प्रीती सावंत (द्वितीय)

स्टार प्रवाहची महाराणी 
अल्का कोल्हटकर (प्रथम), सुवर्णा गढे (द्वितीय), वर्षा तारापुरे (तृतीय)


मेडिमिक्स श्रावण साज स्पर्धा
श्रावण सोहळ्यांतर्गत मेडिमिक्स हर्बल फॅशन शो अर्थात श्रावण साज स्पर्धा, मेडिमिक्स उखाणा स्पर्धा आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 
रिसो राईसब्रॅन ऑइल क्वीन स्पर्धा

रिसो राईसब्रॅन ऑइल क्वीन स्पर्धा
रिसो राईसब्रॅन ऑइल आयोजित फुगडी, उखाणा घेणे, श्रावणाचे गाणे म्हणणे आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. एवढेच नव्हे, अजूनही तुम्हाला रिसो राईसब्रॅन ऑइलकडून मिळू शकते सिंगापूरला जायची संधी. जिंकण्यासाठी आम्हाला लिहून पाठवा तुमच्या जीवनातील अशा क्षणांबद्दल ज्यात तुम्ही आयुष्य जगलात शंभर टक्के. 
 

Web Title: Shawlana sublimation chime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.