मोबाईल नेटवर्क नसलेल्या शेकापूरचा आश्विन यूपीएससी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:54+5:302021-09-26T04:21:54+5:30
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा संतोषकुमार गवई पातूर (अकोला) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. ...
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
संतोषकुमार गवई
पातूर (अकोला) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. अशा खेड्यातून येणाऱ्या आश्विनने उंच भरारी घेतली असून, जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यूपीएससीची खडतर असलेली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शेकापूर येथील बंजारा तांड्यातील आश्विन बाबूसिंग राठोड यांनी ५२० ही रँक मिळवत डोळे दीपवणारे यश संपादन करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आश्विन राठोड यांच्या वडिलांचा प्रवासही प्रेरणादायी असून, त्यांनी सुद्धा पोलीस निरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे. ते नुकतेच दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यापुढील आयपीएस अधिकारी पदाचा प्रवास जणूकाही आश्विन राठोड यांनी पूर्ण केला, काहीसे असे चित्र यूपीएससी परीक्षेच्या यशामुळे निर्माण झाले आहे. आश्विन यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ-बहीण आणि शिक्षकांना दिले आहे.