शेवंती फुलांच्या सुुगंधाने दरवळला कृषी विद्यापीठाचा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:22 PM2018-11-28T14:22:43+5:302018-11-28T14:23:02+5:30

अकोला: शेवंती फुलांचे आपण एक दोन प्रकार बघतो; पण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या फुलांच्या शंभर जातीचे जतन केले असून, मन मोहून टाकणाऱ्या शेवंतीचा सुगंध कृषी विद्यापीठात दरवळला.

Shevanti flowering in The campus of the Agricultural University | शेवंती फुलांच्या सुुगंधाने दरवळला कृषी विद्यापीठाचा परिसर

शेवंती फुलांच्या सुुगंधाने दरवळला कृषी विद्यापीठाचा परिसर

Next

अकोला: शेवंती फुलांचे आपण एक दोन प्रकार बघतो; पण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या फुलांच्या शंभर जातीचे जतन केले असून, मन मोहून टाकणाऱ्या शेवंतीचा सुगंध कृषी विद्यापीठात दरवळला.
मन मोहून टाकणाºया विविध फु लांनी सध्या या परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे. शेवंती फुलांसह येथे निशिगंधाच्या १०० वेगवेगळ््या प्रकारच्या फुलांच्या जातीचे जतन करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ््या प्रकारच्या १०० गुलाब फुलांच्या जातींची लागवड करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी यासाठी कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रागंण विद्या उद्यान क्षेत्राला यासाठी जागा उपलब्ध करू न दिली आहे. या विभाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता व डॉ. मनीषा देशमुख यांनी विशेष परिश्रमातून फुलबाग फुलविली असून, उद्यान विद्या विभागा समोरील ग्लॅअरडिया फुंलाची आतापर्यंत दहा क्विंटल विक्री करण्यात आली आहे.
पारंपरिक शेतीसोबत शेतकरी फुलशेतीकडे वळत आहे, याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने वेगवेगळ््या फुले विकासावर भर दिला असून, ही फुले शेतकºयांना बघता यावी, असा यामागील उद्देश आहे.
 

 

Web Title: Shevanti flowering in The campus of the Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.