"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

By आशीष गावंडे | Published: November 7, 2022 02:12 PM2022-11-07T14:12:09+5:302022-11-07T14:17:15+5:30

Aaditya Thackeray : जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

"Shinde government is out of constitution, will collapse soon", Aaditya Thackeray's attack in Akola | "शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

Next

अकोला : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेचा विश्वासघात करून सत्ता स्थापन केली. हे सरकार घटनाबाह्य, नियमबाह्य असून लवकरच कोसळणार, असे म्हणत युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात आयोजित सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.

राज्यातील सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करण्याचे काम शिंदे सरकारने केले असून चार मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जातात कसे, याचा विचार जनतेने केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेचा विश्वासघात करून सत्ता स्थापन केली. हे सरकार घटनाबाह्य, नियमबाह्य असून लवकरच कोसळणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. 

पन्नास खोके घेणाऱ्या 40 आमदारांना राज्यात तोंड दाखवने मुश्किल झाले आहे. लग्नात गेल्यावर नातेवाईक व नागरिक विचारणा करीत असल्याने गद्दारांची मोठी अडचण झाली आहे. अतिवृष्टि झाल्यावरही शेतकरी बांधवांना आर्थिक मदत नाही. जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी 'ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा' अशा घोषणाही देण्यात आल्या. 

याचबरोबर, ठाकरे कुटुंबाला संपविन्याचा कुटील डाव रचला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, आम्ही जनतेच्या मनात आहोत. कोविड काळात जनतेला कुटुंब म्हणून प्रेम दिले.पक्षासोबत निष्ठा न ठेवनाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात 2 लाख रुपये जमा केले. या सरकारला शेतकऱ्यांचे सोयर सूतक नाही.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेनिमित्त सकाळी ११ वाजता शिवणी विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी... जय शिवाजी अशा घोषणा देत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. 

शिवसैनिकांकडून चौकाचौकांत स्वागत
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी शिवणी येथे, नेहरू पार्क चौक, गांधी रोड, जय हिंद चौकात उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदित्य यांच्या स्वागतासाठी शहरातील चौकांमध्ये भगव्या पताका, झेंडे आणि फ्लेक्स, बॅनर लावण्यात आले होते.
 

Web Title: "Shinde government is out of constitution, will collapse soon", Aaditya Thackeray's attack in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.