शिरपूर येथे श्वेतांबर जैन भाविकांची पायदळ वारी
By admin | Published: January 11, 2016 01:44 AM2016-01-11T01:44:39+5:302016-01-11T01:44:39+5:30
कठोर तपसाधना: मुंबईच्या ७00 भाविकांचा सहभाग.
शिखरचंद बागरेचा /वाशिम: शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या पूजनाची व दर्शनाची आपल्या मनुष्य जीवनात एकदा तरी संधी मिळावी या ङ्म्रद्धेने मुंबई येथील ङ्म्री. अजित नेमी श्वेतांबर मूर्तिपूजक जैन मित्र मंडळाच्या सातशे भाविकांनी अंतरिक्ष पार्श्वनाथांचा धावा करीत ९ जानेवारी रोजी पहाटे ७ वाजता शिरपूर नगरीच्या तीन किलोमीटर बाहेरून मंदिरापर्यंंत चक्क पायदळ वारी केली. याप्रसंगी शहनाई, वाद्य मृदंगाच्या निनादात व ह्यदादा, दरवाजा तेरा खोल खोल रेह्ण च्या गजरात मुंबईच्या सातशे भाविकांनी अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या चरणी आपला माथा टेकला. पायदळवारीत महिला, पुरुष, युवक, युवती, बालक बालिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पंन्यास प्रवर आचार्यसम प. पु. चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परमशिष्य व अंतरिक्ष तीर्थ उद्धारक प. पु. मुनीङ्म्री विमलहंस विजयजी महाराज साहेब, यांच्या प्रेरणेने ङ्म्री. अजित मुनी जैन मित्र मंडळाच्या सुमारे सातशे भाविकांनी मुंबई येथून शनिवारी सकाळी ७ वाजता शिरपूर नगरीजवळ पोहोचून तीन किलोमीटरचे अंतर पायदळ वारी करून अंतरिक्ष पार्श्वनाथाचा धावा केला. मागील ३५ वर्षांंंपासून बंदिस्त असलेल्या अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवतांचा दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मुनीङ्म्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेने ३ ते ५ जानेवारी असा तीन दिवसीय निरंकार उपवास म्हणजेच अठ्ठम तपामध्ये मुंबईच्या कांदिवली घोघारी विसाङ्म्रीमाली जैन मित्र मंडळाच्या तब्बल एक हजार भाविकांनी सहभाग घेऊन कठोर तप साधना पूर्ण केली होती.