अकोला बाजार समितीत शिरिष धोत्रेंची बिनवरोध निवड, सभापतीपदाचा चौकार
By राजेश शेगोकार | Published: May 18, 2023 05:01 PM2023-05-18T17:01:23+5:302023-05-18T17:08:47+5:30
अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली होती
राजेश शेगाेकार
अकोला : जिल्हयातील सर्वात माेठया अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिरिष धाेत्रे तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर महल्ले यांची उप सभापती म्हणून अविराेध निवड करण्यात आली आहे.
अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली होती. या समितीमध्ये गेल्या चार दशकांपासून सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. यावेळी सहकार पॅनलचे १५ उमेदवार निवडून आले असून,या पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना ठाकरे गट एकत्र हाेते. बाजार समितीवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता आल्यानंतर गुरुवार, १८ मे रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी शिरीष धोत्रे तर उपसभापती पदासाठी ज्ञानेश्वर महल्ले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सन २००८ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिरीष धोत्रे यांची सभापतीपदी निवड झाली होती. यंदाही पूर्ण बहुमत असल्याने धोत्रे यांच्या गळ्यात पुन्हा सभापती पदाची माळ पडली असून ते सलग चाैथ्यांदा सभापती झाले आहेत.