शिर्ला ग्रा.पं. सदस्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:54 AM2021-02-20T04:54:35+5:302021-02-20T04:54:35+5:30
पातूर : पातूर-खानापूर रस्त्यावरील खड्ड्यावर मुरूम टाकावा, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करीत माजी सभापती अनंता बगाळे यांनी तहसीलदारांना निवेदन ...
पातूर : पातूर-खानापूर रस्त्यावरील खड्ड्यावर मुरूम टाकावा, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करीत माजी सभापती अनंता बगाळे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. यावेळी मागणी २४ तासात पूर्ण न झाल्या आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला होता. २४ तास उलटूनसुद्धा मागणी पूर्ण न झाल्यामुळे शिर्ला येथील संतप्त ग्रा. पं. सदस्यांनी दि. १९ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले.
पातूर-खानापूर रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी ग्रामसेवकास तत्काळ खड्ड्यात मुरुम टाकून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सूचना केली. त्यानुसार, रस्त्यावरील खड्ड्यात मुरुम टाकण्यात आला. तसेच खड्डे बुजविण्यात आले. यावेळी माजी पातूर पंचायत सभापती अनंता बगाडे, पातूर विकास मंचाचे संयोजक शिवकुमार बायस, मंगल डोंगरे, मंगेश गाडगे, कैलास बगाडे आदी उपस्थित होते. (फोटो)