उमेदवारीसाठी शिवसेनेत गर्दी; शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:38 PM2019-09-14T15:38:22+5:302019-09-14T15:38:33+5:30
शिवसेनेनेही जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या शुक्रवारी मुंबईत मुलाखती घेतल्या.
अकोला: भाजप, शिवसेना युतीच्या आणाभाका दोन्ही पक्षाचे प्रमुख दररोज घेत असले तरी दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी करून स्वबळाची तयारी ठेवलेली दिसून आली आहे. शिवसेनेनेही जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या शुक्रवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. यावेळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी शिवसेना भवनात मोठी गर्दी केली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी आपला दावा पक्षश्रेष्ठींपुढे सादर केला. भाजप-शिवसेना युतीसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू असून, पाचपैकी किमान दोन मतदारसंघ शिवसेनेला मिळावे, असा सेनेचा आग्रह असून, बाळापूर, अकोट या मतदारसंघात उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे आजच्या मुलाखतीवरून दिसून आले. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे, खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत, माजी आमदार दगडू सकपाळ, विश्वनाथ नेरूळकर, अमोल कीर्तीकर, मनोहर गायकी, प्रवीण महाले यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.
अकोट मतदारसंघ सेनेला देण्याची पुन्हा मागणी
चार विधानसभेसाठी राज्यात भाजप-सेना युतीसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू असून, यामध्ये अकोट मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात यावा, अशी मागणी मुलाखतीनंतर सर्व इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींना भेटून केली. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. गेल्या वेळी या मतदारसंघात भाजपाचे आ.भारसाकळे विजयी झाले; मात्र त्यांच्या संदर्भात प्रचंड नाराजी असून, भाजपामध्येही त्यांच्या विरोधात बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती यावेळी इच्छुकांनी नेत्यांना दिली.
आजी-माजी आमदार शर्यतीत; भाजपवर दबाव वाढविला
भाजप जागा वाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शिवसेनेने सर्वच मतदारसंघासाठी मुलाखती देऊन भाजपवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. भाजपच्या आमदारांविरोधात आम्ही लढू शकतो आणि हक्कांच्या मतांचे विभाजन करू शकतो, असाच संदेश सेनेने सर्व मतदारसंघासाठी मुलाखती घेऊन दिला आहे. विशेष म्हणजे अकोटात आ. गोपीकिशन बाजोरिया व माजी आ. संजय गावंडे या आजी-माजी आमदारांनीही मुलाखती देऊन पक्षासमोर समर्थ पर्याय ठेवला आहे.
यांनी दिल्या मुलाखती
अकोला पूर्व
गोपाल दातकर
श्रीरंग पिंजरकर
मुकेश मुरुमकार
विजय मालोकार
मंगेश काळे
देवश्री ठाकरे
अकोला पश्चिम
राजेश मिश्रा
अतुल पवनीकर
प्रदीप गुरुखुद्दे
सुरेंद्र विसपुते
अश्वीन नवले
गजानन चव्हाण
प्रकाश वानखडे
अकोट
गोपीकिशन बाजोरिया
संजय गावंडे
अनिल गावंडे
डॉ. विनित हिंगणकर
दिलीप बोचे
श्याम गावंडे
विजय मोहोड
राहुल श्याम कराळे
मनीष कराळे
माया म्हैसने
बाळापूर
नितीन देशमुख
सेवकराम ताथोड
उमेशआप्पा भुसारी
गोपाल दातकर
राहुल सुरेश कराळे
रविंद्र पोहरे
ज्योत्सना चोरे
रेखा राऊत
अजय ढोणे
आनंद बनसरे
संजय भांबेरे
गणेश तायडे
रविंद्र मुर्तडकर
संजय शेळके
सुभाष धनोकार
दीपक बोत्रे
विठ्ठल सरप
सुनील आवटे
मूतीर्जापूर
प्रा. डॉ. श्रीप्रभू चापके
दीपक सदाफळे
महादेव गवळे