गृहमंत्र्यांचा वचक नसल्यामुळेच पाेलिस बलात्काराची तक्रार नाेंदवत नाहीत- सुषमा अंधारे यांचे टिकास्त्र

By आशीष गावंडे | Published: November 20, 2023 10:16 PM2023-11-20T22:16:32+5:302023-11-20T22:16:40+5:30

साेमवारी रात्री सुषमा अंधारे अकाेल्यात दाखल झाल्या असता, त्यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Shiv Sena deputy leader Sushma Andhare's criticism of police not registering rape complaint due to absence of Home Minister's counsel | गृहमंत्र्यांचा वचक नसल्यामुळेच पाेलिस बलात्काराची तक्रार नाेंदवत नाहीत- सुषमा अंधारे यांचे टिकास्त्र

गृहमंत्र्यांचा वचक नसल्यामुळेच पाेलिस बलात्काराची तक्रार नाेंदवत नाहीत- सुषमा अंधारे यांचे टिकास्त्र

अकाेला: राज्यातील महिला,तरुणी व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ हाेत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वचक नसल्यामुळेच अकाेल्यात पाेलिसांनी दाेन दिवस बलात्काराची तक्रार नाेंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आराेप शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. साेमवारी रात्री सुषमा अंधारे अकाेल्यात दाखल झाल्या असता, त्यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शहरातील खदान पाेलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या शरिरावर जखमा करीत तीच्यावर बलात्कार झाल्याची घटना १७ नाेव्हेंबर राेजी उघडकीस आली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगल्या गेली असून गृहखाते सांभाळण्यास गृहमंत्री अपयशी ठरल्याची टीका सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पिडीतेच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहता पक्षाच्यावतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याचेही सुषमा अंधारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, गाेपाल दातकर, वैशाली घोरपडे, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, याेगेश्वर वानखडे, ज्ञानेश्वर म्हैसने, शहर प्रमुख (अकाेला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकाेला पूर्व) राहुल कराळे, सरिता वाकोडे, वर्षा पिसोडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनिकर, उमेश जाधव, अभय खुमकर आदी उपस्थित हाेते. 

आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्राची!
मराठा आरक्षणाचा ठराव पारित करण्यासाठी संसदेत २७२ खासदारांची गरज आहे. भाजपकडे ३०० पेक्षा जास्त खासदार असताना, ठराव मंजूर केला जात नाही. राज्यात जाणीवपूर्वक दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपकडून हाेत आहे. मनाेज जरांगे यांना मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shiv Sena deputy leader Sushma Andhare's criticism of police not registering rape complaint due to absence of Home Minister's counsel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.