शिवसेना नेते आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:17 PM2018-11-14T13:17:11+5:302018-11-14T13:17:45+5:30
अकोला: शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे.
अकोला: शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे १९ नोव्हेंबर रोजी शहरात आगमन होत आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यासोबतच कुटुंबातील महिलांना साडी-चोळी देऊन बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत १५ नोव्हेंबर रोजी भूमिका स्पष्ट करतील.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी शिवसेना सतत आग्रही असल्याचे दिसून येते. राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने शेतकºयांप्रती भाजपाच्या धोरणावर टीकेची झोड उठवत अनेकदा मोर्चे, आंदोलने छेडल्याचे दिसून आले. सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस आदी उत्पादित मालाची हमीभावाने खरेदी करण्यासोबतच थकीत चुकारे तातडीने अदा करण्यासाठी सेनेने शासनाच्या नाकीनऊ आणल्याचे चित्र आहे. निसर्गाची अवकृपा, सततची नापिकी व शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. अशा शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे येत्या १९ नोव्हेंबर रोजी अकोला शहरात दाखल होत आहेत. यासंदर्भात मंगळवारी सह-संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, अकोला पूर्व विधानसभा महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली घोरपडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक विश्रामगृह येथे बैठक पार पडली. बैठकीला महिला जिल्हा संघटिका माया म्हैसने, देवश्री ठाकरे, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, तालुका प्रमुख विकास पागृत, रवींद्र मुर्तडकर, संजय शेळके, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) अतुल पवनीकर, हरिभाऊ भालतिलक, प्रदीप गुरुखुद्दे, नगरसेवक गजानन चव्हाण, योगेश गीते, मंजूषा शेळके, वनिता पागृत, सुनीता श्रीनिवास, मंदा देशमुख, शिल्पा ढोले, उषा गिरनाले, उषा चौधरी, युवा सेनेचे विठ्ठल सरप, उपतालुका प्रमुख गोपाल इंगळे, संजय भांबेरे, गजानन बोराडे, अर्जुन गावंडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
संपर्क प्रमुख गुरुवारी अकोल्यात!
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौºयासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत १५ नोव्हेंबर रोजी शहरात दाखल होत आहेत. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप व कुटुंबातील महिलांना साडी-चोळीचे वाटप केले जाणार आहे.