शिवसेनेकडून पेट्राेल दरवाढ, दानवेंचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:22 PM2020-12-12T16:22:08+5:302020-12-12T16:25:15+5:30
Shiv Sena protests मदनलाल धिंग्रा चाैकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
अकाेला:केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विराेधात केलेले वक्तव्य तसेच मागील काही दिवसांपासून पेट्राेल,डिजेलच्या वाढत चाललेल्या किंमतीच्या मुद्यावरून शहरातील मदनलाल धिंग्रा चाैकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी गाढवाच्या पाठीवर केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची प्रतिमा लावून त्याला चपलांचा हार घालण्यात आला.
केंद्र शासनाने संसदेत कृषी कायद्याच्या संदर्भात विराेधी पक्षासाेबत काेणतीही साधक बाधक चर्चा न करता परस्पर कृषी कायद्याला मंजूरी दिली. हा कायदा शेतकरी हिताचा नसल्याचा आराेप करीत मागील अनेक दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब,हरियाणासह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदाेलन छेडले आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदाेलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांच्या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आराेप करीत शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने आंदाेलन पुकारण्यात आले. तसेच इंधनाच्या दरात सातत्याने वाढ हाेत असताना दरवाढ कमी करण्यासंदर्भात माेदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत यावेळी केंद्र सरकारच्या धाेरणांचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदाेलनात उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.गटनेता गाेपाल दातकर,विकास पागृत, शहर प्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, राहुल कराळे, नितीन मिश्रा, याेगेश गिते, तरूण बगेरे, अविनाश माेरे, प्रकाश वानखडे, शरद तुरकर,केदार खरे, अभय खुमकर, शरद घाेलप, मनीष आवारे, गणेश धाेत्रे यांसह शिवसैनिक उपस्थित हाेते.