शिवसेनेकडून पेट्राेल दरवाढीचा निषेध; गुलाबाचे फूल, चाॅकलेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:16+5:302021-06-09T04:23:16+5:30
वर्षभराच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलच्या किमतींत प्रचंड वाढ झाली आहे. आजराेजी पेट्राेल १०० रुपये लिटर असून घरगुती गॅसच्या किंमतीत ...
वर्षभराच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलच्या किमतींत प्रचंड वाढ झाली आहे. आजराेजी पेट्राेल १०० रुपये लिटर असून घरगुती गॅसच्या किंमतीत माेठी वाढ केली आहे. इंधनाचे दर वाढवल्यामुळे वाहतूक व्यवस्था महागली असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही आपसूकच वाढ झाली आहे. महागाइच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्याच्या उद्देशातून भाजपचे विराेधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उठसूठ महाविकास आघाडी सरकार विराेधात बेताल वक्तव्ये करीत असल्याचे नमूद करीत शिवसेनेचे शहर प्रमुख (अकाेला पश्चिम) राजेश मिश्रा यांनी केंद्र शासनाच्या धाेरणांचा अनाेख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर तसेच जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या निर्देशानुसार राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी अशाेक वाटिका चाैकातील पेट्राेल पंपासह शहरातील इतरही पेट्राेल पपांवर जाऊन ग्राहकांना गुलाबाची फुले व चाॅकलेट देत वाढत्या महागाईची जाणीव करून दिली. तसेच माेदी सरकारच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. यावेळी शहर प्रमुख (अकाेला पूर्व) अतुल पवनिकर, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गिते, संघटक तरुण बगेरे, नीलिमा तिजारे, शुभांगी किनगे, सुनिता श्रीवास, मा. नगरसेवक शरद तुरकर, सुरेंद्र विसपुते, मुन्ना मिश्रा, सागर भारुका, यशवंत सवाई, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, केदार खरे, याेगेश अग्रवाल, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, याेगेश गीते, कुणाल शिंदे, मनाेज बाविस्कर, गजानन बाेराडे, सुरेश इंगळे, रूपेश ढाेरे, गणेश बुंदेले, गाेपाल लव्हाळे, विक्की ठाकूर, रवि अवचार, मुन्ना गीते, अभिषेक मिश्रा, शकील खान, रवि घ्यारे, कुणाल वानखडे, रवी सातपुते, संजय अग्रवाल आदी उपस्थित हाेते.