मुख्यमंत्र्यांच्या ‘जनआशीर्वादा’ने शिवसेनेत अस्वस्थता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:57 PM2019-08-11T12:57:53+5:302019-08-11T12:58:00+5:30
पाचपैकी किमान दोन मतदारसंघांची अपेक्षा ठेवून असलेल्या शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या ‘जनआशीर्वादा’ने अस्वस्थता पसरली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अकोल्यातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा उल्लेख कटाक्षाने टाळला. भाजपची यात्रा असल्यामुळे साहजिकच भाजपचा उदो-उदो होणे अपेक्षित होते; मात्र भाषणाच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांच्या नावांचा उल्लेख करीत उपस्थित जनसमुदायाला त्यांच्या पाठीशी आशीर्वाद कायम ठेवण्याचे साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही कृती भाजपाच्या विद्यमान आमदारांना व त्यांच्या समर्थकांना उमेदवारीच जाहीर झाल्यासारखी वाटल्याने युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. अकोल्यात पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत भाजपाचे आमदार असून, उर्वरित एका मतदारसंघासाठी भाजपा, शिवसेना व शिवसंग्राम अशी स्पर्धा आहे. त्यामुळे पाचपैकी किमान दोन मतदारसंघांची अपेक्षा ठेवून असलेल्या शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या ‘जनआशीर्वादा’ने अस्वस्थता पसरली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती व आघाडी गृहीत धरून सध्या या दोन्ही पक्षांच्या घटक पक्षांमध्ये मतदारसंघ मिळविण्यासाठीच स्पर्धा सुरू झाली आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा अशा सर्वाधिक प्रबळ दावेदारीचा मतदारसंघ आहे. युतीमध्ये भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघावर शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावा आहे. २०१४ च्या निवडणुकीत अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघ जिंकणाऱ्या भाजपाला बाळापूर मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. खरेतर ही जागा युतीमध्ये शिवसंगामला देण्यात आली होती; मात्र जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे ही जागा ऐनवेळी भाजपाला देण्यात आली. त्यामुळे शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवत भाजपाच्या मतांना खिंडार पाडले. आता शिवसंग्राम पुन्हा तयारीला लागल्याचे खुद्द विनायक मेटे यांनी अकोल्यात येऊन ठामपणे सांगितल्याने शिवसेनेच्या दावेदारीला आणखी एक प्रबळ दावेदाराची स्पर्धा असल्याचे अधोरेखित झाले. आता बाळापूर कोणाच्या पारड्यात, हा गुंता यावेळीही चांगलाच चर्चेत राहणार आहे. दुसरीकडे शिवसेनेला जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ हवा आहे. अकोट, मूर्तिजापूर व किमान अकोला पूर्व तरी मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. या तिन्ही मतदारसंघांत भाजपाचे आमदार असल्याने विद्यमान आमदारांची उमेदवारी कापणार का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. मूर्तिजापूर, अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघापेक्षाही अकोट या मतदारसंघात शिवसेनेने आपला दावा अधिक प्रबळ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
एकतर हा मतदारसंघ भाजपाने २०१४ मध्ये पहिल्यांदाच जिंकला. यापूर्वी युतीमध्ये या मतदारसंघातून सेनेचा भगवा फडकला होता. त्यामुळे सेनेचा पहिला दावा ‘परंपरा’ या निकषावर सुरू झाला. त्यातच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे ‘बाहेरचे’ उमेदवार या आणखी एका मुद्याची भर पडली व आता त्यांच्यावर शिवसेनेकडूनच निष्क्रियतेचा शिक्का मारला जात असून, त्या करिता तेल्हाºयातून अकोल्यात पळविलेल्या भारत बटालियनचा ताजा आधार जोडल्या जात आहे. या पृष्ठभूमीवर येणाºया काळात शिवसेना व भाजपा युतीच्या जागा वाटपामध्ये अकोट व बाळापूर हे दोन मतदारसंघ सर्वाधिक तणावाचे राहतील, हे स्पष्टच होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी सर्व आमदारांसाठी आशीर्वाद मागितले असले तरी ती औपचारिकता होती, असा सूर ही भाजपाकडून सावध रीतीने व्यक्त होत असला तरी या सुराला स्वबळाचा ‘कोरस’ सामान्य कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळेच सध्या शिवसेनेत अस्वस्थता आहे व ती अस्वस्थताच अकोटात सेनेने घेतलेल्या बैठकीत अधोरेखित झाली हे नाकारता येत नाही.
अकोटात भाजपामध्ये ‘स्थानिक’ उमेदवाराची मागणी
एकीकडे शिवसेना अकोट मतदारसंघावर दावा करीत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी स्पष्ट मागणी ९ आॅगस्ट रोजी अकोटाच झालेल्या भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आल्याने युतीमध्ये मतभेदच नव्हे तर मनभेदाचेही बीजारोपण झाल्याचे स्पष्ट होते. अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीत भाजपाच्याच लोकप्रतिनिधीवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे राहिला तरी भाजपातील मतभेद मिटविण्याचे आव्हान पक्षासमोर राहील.