शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवसेनेचा घेराव

By admin | Published: January 10, 2017 02:28 AM2017-01-10T02:28:55+5:302017-01-10T02:28:55+5:30

जिल्हा सवरेपचारची यंत्रणा नागरी सेवेत कुचकामी असल्याचा आरोप

Shiv Sena's detention of Dean of Government Medical College | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवसेनेचा घेराव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवसेनेचा घेराव

Next

अकोला, दि. ९-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत असलेल्या जिल्हा सवरेपचारची यंत्रणा नागरी सेवा देण्यात कुचकामी असल्याचा आरोप करून सोमवारी शिवसेनेने जीएमसीचे डीन डॉ. राजेश कार्यकर्ते यांना घेराव घातला. शेकडो शिवसैनिकांच्या या घेराव आंदोलनाने सवरेपचार हादरले. डॉ. कार्यकर्ते यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी कार्यालयातील आंदोलन मागे घेतले.
अकोला जिल्हा सवरेपचार रुग्णालयात वर्‍हाडातील कानाकोपर्‍यातून मोठय़ा प्रमाणात रुग्ण येतात. त्यामुळे अकोला सवरेचारात कायम गर्दी असते. ग्रामीण जनतेचे यामध्ये हाल होतात. अनेकदा कुणाकडे जावे, कुणाची तक्रार करावी का, हे देखील समजत नाही. सवरेपचार रुग्णालयात परिविक्षाधीन वैद्यकीय अधिकारी येथे सेवेत असतात. तसेच जीएमसीचे विद्यार्थी प्रात्यक्षिक म्हणूनही येथे सेवा देत असतात. सर्वसामान्य नागरिक जेव्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे रुग्ण म्हणून जातात, तेव्हा त्यांची घोर निराशा होते. अनेकदा ग्रामीण जनतेशी असभ्य वर्तन केल्या जाते. याबाबत काहींनी जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे तक्रार केली होती; मात्र त्याकडे लक्ष न दिल्याने हा प्रकार वाढला. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांच्या कक्षात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेराव घालून जाब विचारला. शिवसेनेचे पश्‍चिम विभागाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडले गेले. संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या आदेशान्वये हे आंदोलन छेडण्यात आले. डॉ. कार्यकर्ते आणि डॉ. देशमुख यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी सेनेचे शहर संघटक तरुण बगेरे, संतोष अनासने, युवा सेनेचे महानगराध्यक्ष सागर भारुका, नितीन मिश्रा, धनंजय गावंडे, राजकुमार मिश्रा, किरण ठाकूर, मनोज बाविस्कर, शशिकांत चोपडे, गजानन चव्हाण, योगेश गीते, बबलू उर्के, संजय अग्रवाल, संतोष रणपिसे, मयूर राठी, कैलास सोनोने, रमेश गायकवाड, दीपक पांडे आदी शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Sena's detention of Dean of Government Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.