मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेला कानमंत्र

By admin | Published: January 7, 2017 02:34 AM2017-01-07T02:34:07+5:302017-01-07T02:34:07+5:30

अकोला मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेची बैठक.

Shiv Sena's message for elections | मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेला कानमंत्र

मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेला कानमंत्र

Next

अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या प्रामाणिक, सक्षम व निष्ठावान कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याचा कानमंत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ज्या मनपा क्षेत्रात निवडणुका होतील त्या ठिकाणच्या जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या संदर्भात पक्षप्रमुखांनी कानमंत्र दिल्याची माहिती आहे.
राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसह महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेच्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीपूर्वी शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांनी पक्षाची जिल्हानिहाय माहिती सादर केल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये नगरपालिका निवडणुकीचा निकाल व पदाधिकार्‍यांच्या कामकाजाचादेखील समावेश होता. ५ जानेवारी रोजी रंगशारदा सभागृहात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची वाटचाल कशी राहील, या विषयावर पदाधिकार्‍यांना संबोधित केले. महाराष्ट्रात ज्यांना बोट धरून चालविण्यास शिकविले त्यांनीच कालांतराने शिवसेनेचा कसा घात केला, यावर पक्ष प्रमुखांनी नैसर्गिक मित्र पक्षाला चिमटे काढले. २0१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत युतीच्या मुद्यावरून निर्माण झालेला शिमगा कसा विसरता येईल, असे सांगत जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्था
शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी तातडीने बोलावलेल्या आढावा बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाज पसोबत युती करणार किंवा नाही, यासंदर्भात पक्ष प्रमुख संकेत देतील, अशी पदाधिकार्‍यांना अपेक्षा होती. तसे कोणतेही संकेत उद्धव ठाकरे यांनी न दिल्यामुळे युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र आहे.

दबावतंत्र झुगारा!
महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी पक्षाच्या निष्ठावान, प्रामाणिक व सक्षम कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याकडे लक्ष द्या. केवळ दुकानदारीचे उद्दिष्ट समोर ठेवून मर्जी तल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी पक्षावर दबावतंत्राचा वापर करणार्‍यांना थारा देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Web Title: Shiv Sena's message for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.