पातुरातील शिव यादवची महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरिता वर्णी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:10+5:302021-03-16T04:19:10+5:30
पातूर येथील शिव संजय यादव याने अकोला येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये त्याने घवघवीत ...
पातूर येथील शिव संजय यादव याने अकोला येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये त्याने घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले आहे. शिव यादव येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पहिलवान संजय यादव यांचा मुलगा असल्याने त्याला कुस्तीचे प्राथमिक धडे घरीच मिळाले. शिवचे पणजोबा सोनाजी यादव, आजोबा प्रल्हादराव यादव हे त्या काळचे नामी पहिलवान होते. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक मल्लांना तयार करण्याचे काम पहिलवान संजय यादव करीत आहे. आजतागायत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अनेक सदस्य आर्मी, सीआरपीएफ, रेल्वे विभाग, पोलीस दलातून देशसेवेचे कार्य करत आहेत. अनेक सदस्य हे शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे कार्य करीत आहे. पातूर तालुक्यात कमी वयात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला शिव यादव हा पहिलाच मल्ल आहे. शिव यांच्या निवडीने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवने निवडीचे श्रेय भोजू बायस, संजय यादव, चंदू वानखडे, महादेव खंडारे, शंकर इनामदार, विष्णू ढोणे, संतोष राऊत, बालू बगाडे, मंगेश गाडगे, राजू उगले, छोटू काळपांडे, कैलास बगाडे, सचिन बारोकार, छत्रपती गाडगे, अजय गायकवाड, रूपेश काळमेघ, भुरू पहेलवान, योगेश इंगळे, बालू पोपळघट, गोलू बायस, बाळू निमकंडे, वासुदेव फुलारी, सागर हरणे, संजय सावत, संजय पेढारकर, अजय तायडे, प्रथमेश घोरे, अभय तायडे, सतीश वानखडे, महेश बोचरे प्रशांत बंड आदींना दिले आहे. (पासपोर्ट)