खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी शिवभक्तांचा तेल्हारा तहसिल व नगरपालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 04:09 PM2019-07-29T16:09:44+5:302019-07-29T16:10:14+5:30
सोमवारी तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे , भजनाच्या गजरात भर पावसात मोर्चा काढला.
तेल्हारा : तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळणी व पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाल्यामुळे शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी कावडधारी शिवभक्तांसह नागरिकांनी सोमवारी तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे , भजनाच्या गजरात भर पावसात मोर्चा काढला. खड्डे बुजविण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवभक्तांनी दगडाला खड्ड्यातीला पाण्याचा जलाभिषेक करून निषेध केला.
तसेच स्थानिक गौतमेश्वर मंदिर समोर पूल व रस्ता बाधण्याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. श्रावण महिन्यात तेल्हारा शहरासह तालुक्यातून तून मोठ्या प्रमाणात कावडधारी शिवभक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगडला जातात. परंतु, कावडमार्गाची खड्ड्यांमुळे पुरती वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाले असून, अनेक जन जखमी झाले. तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. येत्या काही दिवासातच कावड यात्रेला सुरुवात होणार असून कावड धारक भाविक भक्ताना पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. सदर रस्त्यांवरील खाड्यामुळे अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावड धारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही . या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधी , व संबधित अधिकारी यांचे अनेक वषार्पासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे .चाळणी झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी तसेच तेल्हारा येथील गौतमेश्वर मंदीरासमोरील गौतमा नदीवर पुलबांधून रस्ता करण्यात यावा या करिता तहसीलदार व मुख्याधिकारी न.प.तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते , पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे , भरीप बहुजन महासंघचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे ,सुभाष रौदळे, कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे व डॉ. अशोक बिहाडे , एकता मंडळाच्या वतीने गजानन गायकवाड , लोकजागर मंच वतीने चंर्द्कांत मोरे , गौतेमेश्वर संस्थान तर्फे राहुल मिटकरी , युवाक्रांति विकास मंच अध्यक्ष रामा फाटकर, आदींनी मनोगत व्यक्त केले . आयोजित मोर्चा मध्ये स्थानिक कावड धारी शिव भक्त मंडळ , विविध मंडळे , सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पाधिकारी सह कार्यकर्ते व नागरिक शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते . ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शन खाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .