मूर्तिजापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:15 AM2021-04-03T04:15:38+5:302021-04-03T04:15:38+5:30

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक बबनराव डाबेराव, अशोक अण्णा अव्वलवार,कमलाकर गावंडे, नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे,शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक विनायक ...

Shiva Jayanti celebrations at Murtijapur | मूर्तिजापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

मूर्तिजापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

googlenewsNext

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक बबनराव डाबेराव, अशोक अण्णा अव्वलवार,कमलाकर गावंडे, नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे,शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक विनायक गुल्हाने, शिवसेना तालुका प्रमुख संगीत पाटील कांबे, रवी राठी, निजाम इंजिनिअर, नासीरोद्दीन ठेकेदार, राजीकभाई, न.प.उपनगराध्यक्ष सुनील महादेवराव पवार,नगरसेवक सचिन देशमुख, गजानन नाकट, ज्ञानेश्वर गडवाले, आशिष बरे, भारत जेठवाणी, लाला डाबेराव, संजय गुप्ता, पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर, दिलीप देशमुख, अजय प्रभे, सुमीत सोनोने, रामा भिंगारे, शरद हजबे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने नगरसेवक विनायक गुल्हाने व तालुका प्रमुख संगीत पाटील कांबे यांनी केले होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आपले विचार मांडले. शिवजयंतीला शहरातील पत्रकार बांधवांचा सन्मान केल्या जाणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख संगीत पाटील कांबे यांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना शहर व तालुक्यातील वासुदेवराव तांबडे,जगदेव छबीले,बंडु लांडे,मनोहर ताकतोडे,मुन्ना नाईकनवरे, बालू टांक,सचिन गुल्हाने,डॉ. महेंद्र नवघरे, अभिनय गुल्हाने, सविनय गुल्हाने, संजय गुल्हाने,नंदकिशोर बबानिया, पांडु कवटकर, विलास देशमुख, किसना गावंडे, नाजूक गोरले, पुरूषोत्तम गोरले, सदाशिव शेळके, सुबोध बंग, जय ग्याने,मुन्ना श्रीवास, दिनेश राउत,आकाश जैन,सौरभ भोपत,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन किशोर श्रीराव यांनी केले. (फोटो)

Web Title: Shiva Jayanti celebrations at Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.