शिवाजी कॉलेजने घेतली साडेसहा हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:17 AM2021-05-16T04:17:56+5:302021-05-16T04:17:56+5:30
याकरिता प्राध्यापकांनी पेपर सेट केले व क्वेस्ट ई टेक टीमने कॉम्प्युटर विभागाच्या सहकार्याने परीक्षेचे आयोजन केले. १५ मे रोजी ...
याकरिता प्राध्यापकांनी पेपर सेट केले व क्वेस्ट ई टेक टीमने कॉम्प्युटर विभागाच्या सहकार्याने परीक्षेचे आयोजन केले. १५ मे रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेचा सराव व्हावा म्हणून जनरल नॉलेज मॉक टेस्ट घेण्यात आली. एकाचवेळी सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान सराव परीक्षा दिली. त्यामुळे श्री शिवाजी महाविद्यालय अकोला विद्यापीठ स्तराची परीक्षा जास्त विद्यार्थी संख्या असतानासुद्धा राबवू शकते याची प्रत्यक्ष तपासणी केली गेली. सदर परीक्षा आयोजनाचा आराखडा प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी स्वतः तयार केला. ऑनलाईन परीक्षेकरिता प्रा. उमेश पागृत व कॉम्प्युटर विभागाचा विद्यार्थी अच्युत सपकाळ यांनी परिश्रम घेतले.